श्रीमंत रघुनाथराजेंच्या आवाहनाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद; शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्यावतीने वृक्षारोपण संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । फलटण । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शनि मंदिर परिसरात वृक्षारोपण करुन श्रीमंत रघुनाथराजे यांना वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक शुभेच्छा दिल्या.

राजघराण्यातील मान्यवरांसह निकटवर्तीय कार्यकर्त्यांचे गत वर्षभरात निधन झाल्यामुळे यंदा वाढदिवस साजरा न करता कार्यकर्त्यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्यावतीने प्रितसिंह खानविलकर, अभिजीत जानकर, पै.पप्पू शेख, राकेश तेली, यश घाडगे, निलेश खानविलकर, महेश पवार, प्रणव चमचे, रवी कारंडे, रुपेश नेरकर, प्रणव चमचे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिमंदिर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम पार पाडला.

दरम्यान सदर उपक्रमाबाबत माहिती देताना प्रितसिंह खानविलकर यांनी सांगितले की, ‘‘श्रीमंत रघुनाथराजे यांच्या आवाहनानुसार व ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हाती घेतलेल्या ‘हरित वसुंधरा उपक्रमा’चा एक भाग म्हणून शनिमंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वत: खड्डे खांदून उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात आपला सहभाग नोंदवला. येत्या वर्षभरात एकूण 6 हजार 100 झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.’’


Back to top button
Don`t copy text!