दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रमुख असलेल्या कापशी, मोटेवाडी गावातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
कापशी, मोटेवाडी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राजेगटात प्रवेश केल्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाला धक्का बसला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
यावेळी आबा मोटे, विशाल धायगुडे, बाबुराव सुळ, माजी सरपंच, कापशी, हनुमंत दडस, दिलीप नलवडे, माजी सरपंच आळजापूर, किरण येळे ग्रामपंचायत सदस्य, घाडगेवाडी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, महादेव सूळ, माजी सरपंच, कापशी, ज्योतीराम दडस, आप्पा मोटे, माजी चेअरमन, सेवा सोसायटी, दादा दडस, संतोष दडस, जयवंत दडस, सोमनाथ दडस, सुनील दडस, आनंदा दडस, सतीश दडस, बिराजी दडस, गोजाबा दडस, धोंडीबा दडस, बाळू यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.