
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । मच्छी मार्केट, रविवार पेठ सातारा येथील एका पत्र्याचे टपरीच्या शेडच्या आडोशास जुगार अवैध दारु विक्री सुरु असल्याबाबत स्थानिकांकडून माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी कारवाई करत ५ हजार ९२0 किंंमतीचे देशी दारु तसेच विदेशी दारुच्या असे लेबल असलेले १८0 मिलीचे एकूण ६७ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी अजय घाडगे उर्फ पांडा रा. रविवार पेठ सातारा याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
