दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील जुगार, दारु अड्यावर पोलिसांनी चार ठिकाणी कारवाई केली. १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खातगुण येथील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे घरच्या आडोशाला दिलीप राघु कलेटी वय ४७ याच्यावर पुसेगाव पोलिसांनी कारवाई करून त्याच्या ताब्यातून ४२00 रुपयांच्या ६0 बाटल्या हस्तगत केल्या. तर बुध येथे पुसेगाव पोलिसानी चायनीज हॉटेलच्या पाठीमागे कारवाई करून सुमित सुभाष कुंभार वय ३१ याच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून १७८५ रुपयांच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. मेढा पोलिसांनी वेण्णा चौकात हॉटेल अनुसयाच्या पाठीमागे बोळात जुगार अड्यावर कारवाई करून अद्वैत राजेश माने वय २१, रा. जवळवाडी यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे ४१0 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. शाहूपुरी पोलिसांनी जुना मोटर स्टँड येथील शौचालयाच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्यावर छापा टाकून कारवाई केली. त्यात अमोल आनंद वासुदेव वय ३८ रा. मंगळवार पेठ, नथुराम रघुनाथ गायकवाड वय ५0 याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून ६ हजार ६0५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.