परवाना नसेल तर फटाका विक्री करणार्‍यांवर कारवाई


दैनिक स्थैर्य | दि. ९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
देशभरात दीपावली ११ नोव्हेंबरपासून २०२३ पासून अतिशय उत्साहात साजरी होत असल्याने या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची फटाके बाजारात विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवले आहेत. हे फटाके विक्री करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. फलटण तालुयात असा परवाना शहर व ग्रामीण यांच्याकडील पोलीस निरीक्षक यांच्याकडील नाहरकत प्रमाणपत्रान्वये तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार फलटण यांच्यामार्फत विहीत अटी-शर्ती घालून दिला जातो.

कोणत्याही व्यतीने रितसर परवाना घेतल्याशिवाय फटाके विक्री केल्यास हे फटाके जप्त करून त्यांचे दुकान सील करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. तसेच तालुयातील सर्व नागरिकांनी फटाके वाजविताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कमी ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!