कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न


दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
कराड शहर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आरोपीने स्वतःवर टोकदार शस्त्राने वार करून घेऊन तसेच भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

सोनू उर्फ संजीव कपूरसिंग टाक (वय २८, राहणार हडपसर गाडीतळ, तुळजाभवानी वसाहत, ससानेनगर, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी सोनू उर्फ संजीव टाक याला न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग करण्यात आले होते. आरोपी टाक हा येरवडा कारागृहात होता. न्यायालयकडील ट्रान्सफर वॉरंटवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात आणले होते.


Back to top button
Don`t copy text!