खाताबुकचे ‘माय स्टोअर’ अ‍ॅप


 

स्थैर्य, दि.१४: भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर ‘माय स्टोअर’ अ‍ॅप लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप सोप्या साइन-अपसोबत एकीकृत, सहज आणि सुरक्षित इंटरफेसह व्यापा-यांना त्यांचा व्यवसाय १५ सेकंदात ऑनलाईन आणायला सक्षम करते.

खाताबुकचे ‘माय स्टोअर’ अ‍ॅप १३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, हे वापरण्यास सोपे असून पॅन-इंडियाने वापरण्याची खात्री दिली आहे. अ‍ॅप व्यापा-यांना सोशल डिस्टन्सिंगचे निकष राखून व्यवसाय सुरू ठेवायला सक्षम करते. माय स्टोअर अ‍ॅप आधीच देशातील २५ लाखापेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी डाउनलोड केले आहे. अ‍ॅपचा अंदाज आहे की खाताबुकचे एक तृतीयांश वापरकर्ता प्रोफाईल एकाचवेळी माय स्टोअर अ‍ॅप वापरत आहेत.

खाताबुकचे सहसंस्थापक आणि सीईओ श्री रवीश नरेश यांनी सांगितले की ‘आम्ही भारताच्या एमएसएमई विभागाची कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी आणि व्यवसायात होणारा खर्च कमी करण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत आहोत. माय स्टोअरचे लॉन्च आपल्या विद्यमान गोष्टींवर आधारित असून डिजिटल युगात व्यवसाय करण्याच्या अधिक विकसित मार्गासाठी एक मजबूत टेक- ड्रीव्हन पाया प्रदान करत आहे. विशेषत: या महामारीच्या वास्तवात नवीन जगात व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. डिजिटलमध्ये रूपांतरित होऊ इच्छिणाऱ्या ऑफलाईन व्यवसायांसाठी माय स्टोअर अ‍ॅप वापरणे हा एक आदर्श उपाय आहे.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!