पुण्यात दुर्घटना : छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे भीषण आग, आगीत 25 दुकाने जळून खाक


स्थैर्य, पुणे, दि. १६: छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठेला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमध्ये बाजारपेठेतील अंदाजे 25 दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पटाहे साडे चार वाजेच्या सुमारास ही आग लागली. यानंतर अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.

पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये छत्रपती शिवाजी मार्केट आहे. ब्रिटिश कालीन छत्रपती शिवाजी मार्केटची वास्तू दोनशे वर्षे जुनी आहे. या मार्केटमध्ये मासे, चिकन विक्रेते आणि भाजीपाला-फळ विक्रेत्यांची दुकाने आहेत.


Back to top button
Don`t copy text!