दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । वाई ते सातारा जाणाऱ्या एसटी बस आणि गॅसचा ट्रक यांच्यामध्ये दुपारी बावधन ओढ्यानजिक अपघात झाला. या अपघातात १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
साताऱ्याहून वाईला निघालेली एसटी बस आणि वाईहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या गॅसचा ट्रक यांचा अपघात बावधन ओढ्यानजिक झाला. अपघात झाल्यानंतर बसचा चालकासह बसमधील प्रवाशी जखमी झाले असून त्यांना लगेच वाई येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघाताची माहिती वाई पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तसेच वाईचे आगारप्रमुख गणेश कोळी हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णालयातही त्यांनी भेट देवून जखमी प्रवाशी व चालकाची चौकशी त्यांनी केली. या अपघाताची नोंद उशीरापर्यंत वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.