स्थैर्य, वाई, दि.९ : वाई पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एक लाख रूपये किमतीच्या मद्देमाल चोरी प्रकरणाचा छाडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील संशयित अल्पवयीन बालक असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्दलेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी दि.23 नोव्हेंबर रोजी त्यांचे वडील चंद्रकांत साळुंखे यांनी त्यांचे मालकीचा आयशर टेम्पो क्र. एमएच/11/सीएच/4390 मध्ये कोईमतूर येथिल ए.टी.ओ.(आय 1) लि.मधून भारत पेट्रोलियम माहूल, मुंबई या कंपनीचे वॉल्व्ह असलेले बॉक्स गाडीत भरले व ते माहूल, मुंबई येथे पोेहोच करणे करीता दि.27 नोव्हेंबर रोजी पासून सलग तीन दिवस कंपणीला सुट्टया असल्याने त्यांनी गाडी गंगापूरी, वाई येथे त्यांचे घराचे जवळ असलेल्या यात्रा मैदानात उभा केली होती. दि.27 नोव्हेंबर ते दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पर्यन्त गाडी यात्रा मैदानातच उभा होती. दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा.च्या सुमारास फिर्यादी जाणे करीता गाडी जवळ गेले असता त्यांना गाडीची ताडपत्री उचकटलेली व रस्सी 1,00,000/- रु.किंमतीचे डीझेल पेट्रोल टॅक्टला लावण्या करीता वापरण्यात येणारे दोन वॉल्व्ह चोरीस गेल्याची खात्री झाले नंतर त्यांनी वाई पो.स्टे.ला तक्रार दिलेली आहे.
सदर गुन्हयाचे तपास वाई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचने नूसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी करीत असताना त्यांना खास बातमीदारा मार्फत व फिर्यादी कडून मिळालेल्या माहीती नूसार एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे कवूल केले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले 1,00,000/-रु.किं.चे दोन व्हॉल्व्ह जप्त करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई वाई उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार,रमेश कोळी, पो.ना.प्रशांत शिंदे, पो. कॉ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी सहभाग घेतला होता.