देगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.०१: तालुक्यातील देगाव येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार मुलीची आई रेश्मा अस्लम शेख (रा. देगाव, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिलेची मुलगी रविवार, दि. 30 रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेली. ती परत न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे तिचे कोणीतरी अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार तिच्या आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव हे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!