‘आप’च्या स्वराज्य यात्रेची पंढरपुरातून सुरूवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ मे २०२३ | फलटण |
‘आप’ची स्वराज्य यात्रा मंगळवारी बारामती येथून फलटण शहरात ३० मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजता प्रवेश करेल. यावेळी सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. गोपाल भाई इटालियांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेची सुरूवात २८ मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन ६ जून ‘राज्याभिषेक दिनी’ रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. ७८२ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल.

पक्षाचे राष्ट्रीय सहसचिव व प्रदेश सहप्रभारी युवा नेते गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये १३ टक्के मतदान मिळवत ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे सातारा जिल्हाध्यक्ष युवा आघाडी श्री. धैर्यशील अंकुशराव लोखंडे यांनी सांगितले.

फलटण नगरीतील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!