UIDAI कडून आधार कार्ड संबंधीत सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२८आधार कार्ड (Aadhaar Card) जारी करणारी संस्था ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) ने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पैसे घेऊन आधार कार्ड बनवणाऱ्या सेंटर ऑपरेटरच्या आमिषाला बळी पडू नका, असा सल्लाही UIDAI ने दिला आहे. यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. आधार ऑपरेटर्स हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नव्हे, तर रजिस्ट्रार नियुक्त करतात. त्यामुळे आधार सेंटर ऑपरेटरच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिला आहे. (Operators Are Appointed By Registrars, Says UIDAI)


या क्रमांकावर तक्रार करा

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आधार ऑपरेटर UIDAI नव्हे, तर रजिस्ट्रार नियुक्त करतात.

आधार सेंटर ऑपरेटर होण्यासाठी एखाद्याला त्याच्या क्षेत्रातील रजिस्ट्रारशी संपर्क साधावा लागतो. म्हणूनच जर कोणी तुमच्याकडे पैसे घेऊन आधार कार्ड बनवून देत असल्याचं सांगत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. अशी कोणतीही फसवणूक होत असल्यास तात्काळ 1947 क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करा

ऑपरेटर जास्त पैसे घेत असल्यास…

एका युजर्सला उत्तर देताना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) म्हणाले की, कोणत्याही आधार नावनोंदणी एजन्सीने कोणत्याही प्रकारच्या आधार कार्ड बनवण्यासाठी निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क मागितल्यास त्या एजन्सी / ऑपरेटरविरूद्ध तक्रारदेखील दाखल करू शकता.Https://resident.uidai.gov.in/file-complaintवर जाऊन नागरिक ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. आधारशी संबंधित कोणत्याही सेवेसाठी किती शुल्क आहे आणि कोणती सेवा विनामूल्य आहे, याची माहितीसुद्धा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने वेबसाइटवर दिलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!