शिंदेवाडी येथे महामार्ग ओलांडणारा युवक भरधाव कारच्या धडकेत ठार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । खंडाळा । शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलसमोर महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये प्रमोद राजधर भागवत (वय २४,रा.गोधेगाव ता.कोपरगाव जि.अहमदनगर सध्या रा.शिंदेवाडी ता.खंडाळा) हा युवक जागीच ठार झाला आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये महामार्गवरील पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. याठिकाणी एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून त्याठिकाणी सिव्हिलचे काम करण्याकरिता प्रमोद भागवत हा मित्रांसमवेत आला होता. दरम्यान,शनिवार दि.१९ मार्च रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या दरम्यान प्रमोद भागवत व ज्ञानेश्वर भाऊसाहेब आवारे (वय २३,रा.पन्हाळे ता.चांदवड जि.नाशिक) हे दोघे चहा पिण्याकरिता शिंदेवाडी हद्दीमधील एका हॉटेलवर गेले. यावेळी चहा पिल्यानंतर संबंधित हे पुन्हा रूमकडे महामार्ग ओलांडून येत असताना पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात कारने महामार्ग ओलांडणाऱ्या प्रमोद भागवत याला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि प्रमोद भागवत हा घटनास्थळापासून फेकला जात गंभीर जखमी झाला.अपघातानंतर धडक दिलेल्या कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.    यावेळी गंभीर जखमी झालेल्या प्रमोद भागवत याला शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी प्रमोद भागवत याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कण्र्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यन,प्रमोद भागवत हा एकुलता एक असल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

या घटनेची फिर्याद ज्ञानेश्वर आवारे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई ह्या करीत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!