दीड लाखाचे पिस्तुल बाळगणाऱ्या युवकाला साताऱ्यात अटक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । सातारा । शहर पोलिसांना एसटी स्टँड परिसरामध्ये एक 22 वर्षीय तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. यावेळी शहर पोलिसांना पारंगे चौक ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित जात असल्याचे आढळले. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांनी हटकले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि 50 हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 120 रुपये रोख रक्कम मिळून आली.

त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि रिवाल्वर हस्तगत करत सुरज मुन्ना शेख या 22 वर्षीय युवकाला बेकायदेशीर विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेत त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!