
स्थैर्य, वडूज, दि. 28 : बनपुरी ता खटाव येथे बुधवारी रात्री एकजण कोरोना बाधित सापडला आहे. तो रुग्ण राजस्थान राज्यातील कोटा या शहरातून आला असल्याने बनपुरीकरांची चिंता वाढली आहे.
कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आहे कडक लॉकडाऊन असले तरी गेले काही दिवस वेगवेगळ्या मार्गाने बाहेरच्या राज्यातील तसेच मुंबई पुणे येथील लोकांनी गावाकडे धाव घेतली आहे. बनपुरी गावात गेल्या दोन महिन्यात अंदाजे 200 लोकांचा लोंढा आला आहे. 21 तारखेस पंधरा ते वीस लोकांची गाडी राजस्थानमधील कोटा येथुन बनपुरी येथे आली. यामधील सर्व लोकांना बनपुरी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये एक 42 वर्षीय युवक कोरोना बाधीत असल्याचे निदर्शनास आले. हा बाधीत युवक शाळेत कोरंडटाईन न राहता स्वताच्या घरामध्येच कोरंटाईन होउन राहीला होता. गावातील भाजीपाला विकणा-या युवकाशी त्याचा संपर्क आला होता. घरामध्ये वरच्या मजल्यावर त्याच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती. सख्खे आणी चुलत भाउ असे मिळून अकरा माणसांचे कुटंब राहात होते.
चार दिवसापुर्वी खोकल्याचा त्रास होउ लागल्याने कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला होता. त्याचा त्रास कमी होत नसल्याने त्याचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री या युवकाचा अहवाल पोजिटीव्ह आल्याने बनपुरीकरांची चिंता वाढली गेली. या कुटुंबातील इतर पाच सदस्यांना मायणी येथे विलीनीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. तहसीलदार डॉ अर्चना पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ युनूस शेख, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदी कोरोना कमेटीतील अधिकार्यांनी गावास भेट दिली असून परिसर सील करण्यात आला आहे.
13 जणांचे विलगीकरण
बाहेर गावाहून आलेल्या अनेक लोकांचे जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण करण्यात आले होते. मात्र कोट्याहून आलेला धनीक शेठ प्रतिष्ठित घरातील असल्याने तो स्वत:हून होम क्वारंटाईन झाला होता. मात्र त्याच्या या कृत्यामुळे संपुर्ण कुटुंबालाच घोर लागला आहे. घरातील पाच लोक त्याच्याबरोबर राजस्थानहून प्रवास केलेल्या आठ अश्या एकूण तेरा जणांचे मायणी येथील मेडीकल कॉलेजच्या विशेष कोरोनो कक्षात विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.