
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | येथे बारामती वरून फलटणला आल्यावर फलटण एसटी स्टँड वरून एका महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरले असून याबाबतची तक्रार पूजा अंकुश वाघ यांनी फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल नोंदवली आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशनकडे मिळालेली अधिक माहिती अशी की; दि. 30 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बारामती वरून फलटणला आल्यावर फलटण बसस्थानकावर रुपये 30 हजार किमतीचे मणी, मंगळसूत्र व डोरले हे अज्ञात चोरट्याने चोरले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक पूनम बोबडे करीत आहेत.
