दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कोळकी ग्रामपंचायतीतील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाल संपून दीड वर्षे उलटून गेली तरी अजूनही नवीन अध्यक्षाची निवड झालेली नाही. त्यामुळे नवीन अध्यक्षाची निवड ताबडतोब करावी, अशी मागणी नितीन रीटे यांनी कोळकी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
रीटे यांनी अर्जात म्हटले आहे की, कोळकी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाल संपून दीड वर्ष लोटले आहे. गावासाठी तंटामुक्ती अध्यक्ष नसल्याने दीड वर्षात कोणतेही काम झालेले नाही. ही समिती बरखास्त करून नवीन समिती नेमून तंटामुक्ती अध्यक्ष निवडावा.