अनिकेतराजे पाया पडतो; आता राजकारणात सक्रिय व्हा : रमेश धायगुडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 05 फेब्रुवारी 2024 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र, फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आताच्या काळामध्ये राजकारणामध्ये येणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना लोकसभेवर पाठवताना फलटण शहरासह फलटण तालुका सांभाळण्यासाठी युवराज श्रीमंत अनिकेतराजे यांनी आता सक्रिय राजकारणात येणे गरजेचे आहे. असे सांगत असताना “अनिकेतराजे तुमच्या पाया पडतो; पण आता रामराजे व संजीवराजे यांच्या जोडीला तुम्ही सुद्धा सक्रिय राजकारणात या” तुमचा नंबर फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला द्या; असे मत यावेळी खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे यांनी व्यक्त केले आहे.

नुकताच काही दिवसांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी मंचावर फलटणचे युवराज तथा युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे यांनी आपल्या मनोगत यामध्ये श्रीमंत अनिकेतराजे यांच्या बद्दल मत व्यक्त केले होते.

गतकाही वर्षांपासून फलटण शहरासह तालुक्यातून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभागी व्हावे; अशी मागणी राजे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करत होते. परंतु यापूर्वी अनिकेतराजे हे सक्रिय राजकारणामध्ये दिसत नव्हते. गेल्या काही महिन्यांपासून अनिकेतराजे हे फलटण तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत असल्याने राजे गटाच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांची फलटण शहरासह तालुक्याला गरज आहे. त्यांनी घेतलेल्या शिक्षणाची व एवढी वर्ष केलेल्या कामाची आता फलटण तालुक्याला गरज असून श्रीमंत अनिकेतराजे यांनी लवकरात लवकर फलटणच्या सक्रिय राजकारणामध्ये सहभागी व्हावे; अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. असे मत ॲड. ऋषिकेश काशीद यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक बोलताना राजे गटाचे युवा कार्यकर्ते किरण निंबाळकर म्हणाले की; गेल्या काही वर्षांपासून युवराज अनिकेतराजे यांनी सक्रिय राजकारणामध्ये यावे. यासाठी राजे गटाचे सर्व कार्यकर्ते आग्रही आहेत. याबाबत आम्ही त्यांना भेटून सुद्धा सक्रिय राजकारणामध्ये येण्यासाठी आग्रह धरला होता. गतकाही महिन्यांपासून युवराज अनिकेतराजे हे फलटण शहरासह तालुक्यातील जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. हेच आमचे यश असून आगामी काळात फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये नक्कीच युवराज अनिकेतराजे सक्रिय दिसतील; हा आम्हाला विश्वास आहे.


Back to top button
Don`t copy text!