
स्थैर्य, सातारा, दि. 28 : कोरोना महामारीचा फटका मंडप व्यवसायिकांना बसत आहे. मंडप व्यवसायिकांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी मंडप असोशिएशन यांच्यावतीने निवेदनाद्वारे मंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे करण्यात आली.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रामभाऊ हादगे,मनोज शेंडे, हरिष साळुंखे, केटर्स असोशिएशनचे भरत वैष्णव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीत व्यवसायिकांना ज्या अडचणी आल्या आहेत. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असणारा कामगारवर्ग यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ व्यवसायिकांना बँकांच्या हप्त्याची काळजी.तसेच व्यवसाय बंद असल्यामुळे हप्ते फेडता येत नाहीत.त्यामध्ये सूट देण्यात यावी. या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून या व्यवसायांना बँकांचे कर्ज मिळताना सोपे जाईल. तसेच या उद्योगांना अनुदान सुद्धा मिळू शकेल. यासाठी या मागणीची आवश्यकता आहे.हे त्यांना पटवून दिले.
तसेच शासकीय नियमांचे पालन करून व्यवसाय चालू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.एकंदर या व्यवसायांमध्ये जिल्ह्यांमध्ये 30हजार व्यवसायिक आणि सुमारे दीड लाख कामगार वर्ग आणि त्यांचे कुटुंब अवलंबून आहे याची माहिती घेतल्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मंडप व केटर्स असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हातील पालकमंत्र्यांना हे निवेदन देण्यात यावे, असे त्यांनी मंडप व्यावसायिक यांना सांगितले.