भिवंडी येथील गोदामाचे छत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, 7 जण जखमी; 23 जण सुखरूप बचावले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, दि.१: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका गोदामाचे छत कोसळले आहे. मनकोलीच्या हरिहर कंपाउंडमध्ये सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, मनकोली नाकाजवळ ही एक मजली इमारत होती. त्याचा गोडाउन म्हणून वापर केला जात होता. तसेच सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यात एका सुरक्षा रक्षकाचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाला.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मजली गोडाऊनमध्ये एकूणच 31 जण होते. त्याच दरम्यान छत कोसळले. 31 जणांपैकी 23 जण कसेबसे तेथून सुखरूप बचावले. तर एका सुरक्षा रक्षकाचा त्यात मृत्यू झाला.

मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव सौरभ त्रिपाठी असे होते. यानंतर 7 जण ढिगाराखाली दाबल्या गेले होते. त्यांनाही बाहेर काढण्यात आले. ते सगळेच जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!