दैनिक स्थैर्य | दि. 21 एप्रिल 2023 | फलटण | फलटण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी अश्या ह्या फलटणला ऐतिहासिक परंपरा आहे. या फलटणमध्ये गेले बरेच वर्षे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. आता पुढील शिवजयंतीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य – दिव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
मोती चौक येथे पारंपारिक शिवजयंतीच्या पूर्व संध्येला आयोजित कार्यक्रमात श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे – पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटणला ऐतिहासिक वारसा आहे. आपण सुमारे गेले 23 ते 25 वर्षे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. फलटणला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य – दिव्य पुतळा उभा करायचा आहे. श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून साखरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुढील शिवजयंतीच्या पूर्वी आपण फलटणला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य – दिव्य पुतळा उभा करण्याचे आपण आज सगळ्यांनी मिळून ठरवले आहे.