‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे उद्या व्याख्यान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सामाजिक कार्य या विषयावर ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन ‘एआयआर‘ या मोबाईल ॲप वर शुक्रवार, दि. १७ व शनिवार दि. १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सामाजिक सुधारणेत मोठे योगदान आहे. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात बडोदा संस्थानातून झाली होती. सामाजिक क्षेत्रातील महाराजांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या व्याख्यांनातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!