दैनिक स्थैर्य | दि. २२ जुलै २०२४ | फलटण | ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी ललगुण येथे आंबा कलम कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी आपण घरी कलम रोप कसं तयार करू शकतो हे कृषिदूतांनी सांगितले.
या प्रात्यक्षिकासाठी कृषिदूत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सामावेश करून घेऊन त्यांनी आंब्याच्या रोपाचे कलम करून दाखवले. कलम करतेवेळी शेतकऱ्यांनी बऱ्याच शंका विचारल्या व कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांचं समाधान केलं. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कृषिदूतांच्या या आंबा कलम प्रात्यक्षिकाला चांगला प्रतिसाद दर्शविला.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.