
दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। सातारा । जेवणासाठी घरी आलेल्या दांपत्याने घरमालकिणीचे लक्ष चुकवून बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना ओंकार सोसायटी शाहूपुरी येथे घडली आहे.
या प्रकरणी नम्रता युवराज अडसूळ, वय 38 यांनी फिर्याद दिली आहे. मोहम्मद उर्फ गुड्डू फिरासत अन्सारी व तमन्ना मोहम्मद अन्सारी दोघे रा. साबरी मस्जिद समोर, उत्तर प्रदेश, सध्या रा. पोळाचा ओढा, सातारा यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अडसूळ यांनी अन्सारी दांपत्याला घरी जेवायला बोलवले होते. फिर्यादी किचनमध्ये कामात व्यस्त असताना फिर्यादीचे लक्ष चुकवून बेडरूममधील लॉक क लावलेल्या लोखंडी गोदरेजच्या कपाटातून सोन्याचे दागिने अंगठी गंठण व रोख रक्कम असा दोन लाख छत्तीस हजार नऊशे रुपये किमतीचा। मुद्देमाल दांपत्याने लांबवला. पोलीस हवालदार घोडके अधिक तपास करत आहेत.