आदर्कीत कॅनॉलमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळला


दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। फलटण । आदर्की, ता. फलटण येथील माळवाडालगत बोडके फोजी यांच्या वस्तीलगत आज बुधवार, दि.12 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता अज्ञातचा मृतदेह आढळला आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, आज बुधवारी सकाळी माळवाडा येथील शेतकरी शेतात जात असताना कॅनॉलमध्ये एका लोखंडी पाईपला एक मृतदेह अडकला असल्याचे दिसून आले. याची माहिती संबंधित शेतकर्‍याने पोलीस पाटील दीपक भिंगारे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या कालव्यातून बाहेर काढला आहे. अधिक माहितीसाठी पोलीस पाटील दीपक भिंगारे किंवा लोणंद पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!