दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । कुनो । गेल्या वर्षी भारतात चित्ता संवर्धनाचा प्रकल्प सुरू झाला. या अंतर्गत नामिबियातून आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हे नामिबियन चित्ते खुल्या जंगलात सोडण्यात आले आहेत. पण, हे चित्ते आता फक्त कुनोमध्येच नाही, तर उद्यानाची सीमारेषा ओलांडूण आजूबाजूच्या गावातही फिरताना दिसत आहेत. या परदेशी पाहुण्यांमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
कुनो नॅशनल पार्कच्या मोकळ्या जंगलात सोडलेला ओबान हा नर चित्ता गेल्या दोन दिवसांपासून आजुबाजूच्या गावात फेरफटका मारुन काल रात्री कुनो पार्कमध्ये परतला. मात्र आज पुन्हा तो शिवपुरीच्या जंगलात पळून गेला. वनविभागाचे पथक क्षणोक्षणी या चित्त्यावर नजर ठेवत असून त्याला पुन्हा उद्यानात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कुनोच्या आत आणि बाहेर चित्त्यांच्या सततच्या हालचालींबाबत कुनो व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, परिसरात मुक्तपणे फिरणे हा चित्त्याचा स्वभाव आहे. आजपर्यंत जगात कोणत्याही चित्ताने मानवावर हल्ला केलेला नाही. म्हणूनच चित्त्याला घाबरण्यापेक्षा किंवा त्याला घाबरवण्याऐवजी लोकांनी त्याला मुक्तपणे फिरू द्यावे.
रविवारी कुनो नॅशनल पार्कच्या मोकळ्या जंगलातून बाहेर आलेला ओबान चित्ता पार्कपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या झारबरोडा गावात दिसला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी तो बडोदा गावातील शेतातून पार्वती नदीच्या काठावर गेला आणि काही पाणी पिऊन काहीकाळ विश्रांती घेतली. यावेली ओबानचा व्हिडिओही काढण्यात आला. वनविभागाचे पथक ओबानच्या आसपास असून, त्याला कुनो येथे परत पाठवण्यासाठी वन कर्मचारी प्रयत्न करत आहेत. कॉलर आयडीवरुन त्याचे लोकेशन ट्रेस करुन त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. ओबान सध्या शिवपुरीच्या जंगलाकडे निघाला आहे. इथे वन कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कारण येथे सर्वत्र वाहने पोहोचू शकत नाहीत आणि वनकर्मचारीही त्याच्या वेगाने धावू शकत नाहीत.
चित्ता संवर्धनासाठी प्रयत्न
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चित्ता प्रकल्पांतर्गत नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलेल्या 8 चित्त्यांपैकी 4 चित्त्यांना मोकळ्या जंगलात सोडण्यात आले आहे. ओबान आणि आशा यांना 11 मार्च रोजी जंगलात सोडण्यात आले, तर एल्टन आणि फ्रेडी यांना 22 मार्च रोजी सोडण्यात आले. 27 मार्च रोजी नामिबियन मादी चित्ता साशा हिचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. तर दुसरी मादी सियाने 29 मार्जरोजी 4 शावकांना जन्म दिला. याशिवाय 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून 7 नर आणि 5 मादी अशा 12 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना मोठ्या बंदोबस्तात सोडण्याची तयारी सुरू आहे.