
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. २१ : दोन वर्षांपुर्वी झालेल्या भांडणांच्या कारणावरुन दुचाकीची मोडतोड करुन एकास तलवार, कुर्हाड व रॉडने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहरातील भीम नगर येथील चौघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत बाळू भोसले यांचे दाजी नितिन अहिवळे यांचे व रोहित अहिवळे यांचे गाडीच्या धडकेवरुन दोन वर्षांपुर्वी भांडण झाले होते. या कारणावरुन मंगळवार दि. १९ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चंद्रकांत भोसले यांच्या घरासमोर भीमनगर येथे नितिन अहिवळे यांची दुचाकी फोडण्यात आली. या प्रकरणी भोसले व अहिवळे हे याबाबत विचारणा करण्यास गेले असता भीमा विलास अहिवळे, रोहित विलास अहिवळे, विलास नामदेव अहिवळे, दत्ता दिलीप खलाटे सर्व राहणार सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे भीम नगर रविवार पेठ फलटण यांनी आपापसात संगनमत करून चंद्रकांत भोसले व त्यांचा भाऊ सूर्यकांत भोसले, दाजी नितीन अहिवळे व भोसले यांची आई सौ शर्मीला भोसले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, दोन कुराडी, लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी भीमा अहिवळे, रोहित अहिवळे, विलास अहिवळे, दत्ता खलाटे या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे हे करित आहेत.


