
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. 21: तासगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. 20 रोजी 11.30 च्या सुमारास नंदकुमार केवळदास शहा व विमल नंदकुमार शहा हे वडिलोपार्जित घराला घरकुल मंजूर होऊन आल्यामुळे गेले असता रमेश शंकर गुरव, तुषार शंकर गुरव, अभिजित बाळासाहेब भोसले, जितेंद्र बाळासाहेब भोसले यांनी बेकायदेशीर जमाव जमवून प्रकाश नंदकुमार शहा यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
