दमदाटी करून काम बंद पाडल्याने तिघांवर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | शाहूपुरी येथील जिल्हा परिषद कॉलनीतील फिर्यादी राजन रामचंद्र चव्हाण (वय 63 रा. प्रतापगंजपेठ) यांच्या जागेत काम सूरू होते. यावेळी संशयित संदीप शांताराम चव्हाण, रणजित शांताराम चव्हाण, चेतन शांताराम चव्हाण (तिघे रा. शाहूपुरी) यानी कुराड व कुदळ घेवून जागेत सूरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आले. आणि कामगारांना दम देवून काम बंद पाडले. तसेच शौचालयाची तोडफोड करून नुकसान केले आहे. या नुकसानी विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!