स्थैर्य, वाई, दि.१३: वाई एमआयडीसीतील एका कंपनीतच्या शौचालयात लघुशंकेला जाणार्या महिलांचे चोरून मोबाईल कॅमेर्यात चित्रिकरण करणार्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष किसन पवार रा. पेठकर कॉलनी, रविवार पेठ, वाई असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 12/ रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वाई एमआयडीसीतील एका कंपनीत महिलांच्या शौचालयाच्या भिंतीवर संशयिताने स्मार्ट फोन लाकडी पुठ्ठयावर ठेवून त्या पुठ्ठ्याला मोबाईल कॅमेर्यासमोर छिद्र पाडले व मोबाईलचा व्हिडीओकॅमेरा सुरू ठेवला. याप्रकारे संशयित शौचालयात जाणार्या महिलांचे लघुशंकेचे चोरून चित्रीकरण करत होता. ही बाब लघुशंका करण्यास गेलेल्या एका महिलेच्या निर्दशनास आल्यानंतर तिने व्यवस्थापनाकडे तक्रार केली. यानंतर कंपनीने संतोष किसन पवार रा. पेठकर कॉलनी, रविवार पेठ वाई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.