फलटणला कोयत्याने दहशत माजविल्याप्रकरणी एकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । 14 जून 2025 । फलटण । दत्तनगर, फलटण येथील रस्त्यावर गुरुवारी (दि. 12) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नागेश दिलीप मोहिते, (वय 29 वर्षे, रा.दत्तनगर, फलटण) हा दारू पिवून रस्त्यावर फिरत होता. त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने लोकांना दमदाटी करत होता. त्याच्यावर शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) प्रमाणे फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल दत्ताजीराव खराडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली. या संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता, त्यास जमीन मंजूर झाला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे अधिक तपास करत आहेत.

 

 


Back to top button
Don`t copy text!