विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा सातारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । विवाहितेचा जाचहाट व मानसिक छळ केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पती सासू सासरा मोठा दीर चुलत दीर अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौ. काजल तुकाराम भंडलकर वय 22 मूळ राहणार कोथळी तालुका इंदापूर सध्या राहणार सरडे तालुका फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती तुकाराम हनुमान भंडलकर, सासू पद्मावती हनुमंत भंडलकर, सासरे हनुमान शंकर भंडलकर मोठा दिन नामदेव हनुमंत भंडलकर चुलत दीर ज्ञानदेव सुभाष भंडलकर, चंदुलाल दादा भंडलकर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पती सासू-सासरे आणि दीर यांनी वेळोवेळी तुला स्वयंपाक येत नाही तू आम्हाला शेतात विहीर खोदण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत वेळोवेळी तिला घटस्फोटाची धमकी देऊन मारहाण केली व पाच तोळ्याचे दागिने आणले नाहीस तर शिवीगाळ व दमदाटी केली सहाय्यक पोलीस फौजदार एस एस सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!