सोनवडी बुद्रुक येथे ४४ लहान वासरांचा कत्तलीच्या इराद्याने छळ केल्या प्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२३ | फलटण |
सोनवडी बु|, तालुका फलटण हद्दीत सोनवडी ते भाडळी जाणार्‍या रोडवर महारकी नावाची शिवारात तीन पत्र्यांच्या शेडमध्ये गाईंच्या ४४ लहान वासरांचा कत्तलीच्या इराद्याने छळ केल्याप्रकरणी सुमारे आठ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इलाही हुसेन कुरेशी, शाहिद रशीद कुरेशी, शाहरुख जलील कुरेशी, दिशान इमान कुरेशी, तोफिक इम्ताज कुरेशी, इनायक हुसेन कुरेशी, आफताब अफसर कुरेशी (सर्व राहणार कुरेशी नगर, फलटण, तालुका फलटण) व रामा भानुदास जाधव (राहणार पुजारी कॉलनी, फलटण, तालुका फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, सोनवडी बु|, तालुका फलटण हद्दीत सोनवडी ते भाडळी जाणार्‍या रोडवर महारकी नावाची शिवारात तीन पत्र्यांच्या शेडमध्ये काल १२.३५ वाजण्याच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला असता, वरील आरोपी यांनी मिळून एकूण ४४ जर्सी गायीचे लहान वासरे विनाचारा, पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या इराद्याने डांबून ठेवली होती. त्यांची कोणत्याही प्रकारची सोय न करता कमी जागेमध्ये निर्दयीपणे दाटीवाटीने भरून कत्तल करण्यास घेऊन जात असताना मिळून आले, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल शिवाजी घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.

या छाप्यात पोलिसांनी २० हजार रुपये किमतीची १० जर्सी गाईची लहान वासरे, वय अंदाजे १ महिना, काळे पांढरे रंगाचे, ५२ हजार रुपये किमतीची २६ जर्सी गाईची लहान वासरे, वय अंदाजे १ महिना, काळे पांढरे रंगाचे व १६ हजार रुपये किमतीची ८ जर्सी गाईची लहान वासरे, वय अंदाजे १ महिना, काळे पांढरे रंगाचे अशी एकूण ८८ हजार रुपये किमतीची लहान वासरे ताब्यात घेतली आहेत.

या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार खाडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!