स्थैर्य, रहिमतपूर, दि. 20 : बोरगाव (टकले) व अपशिंगे ता. कोरेगाव येथे अज्ञात वाहनाने विनापरवाना व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन आल्यावरुन आठ जणांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी विलास मारुती माने (वय ६२), शालन विलास माने (वय ५६), दिगंबर विलास माने (वय २७), माधुरी विलास माने (वय२४), सर्व रा कठापूर, (ता. कोरेगाव) तर नीता रवींद्र बर्गे (वय ४२), अक्षय रवींद्र बर्गे (वय २३), आकांक्षा रवींद्र बर्गे (वय १८), अंकिता विलास माने (वय २०) विष्णु शंकर टेंबरे सर्व रा अपशिंगे, (ता.कोरेगाव) या सर्वांनी कोविड – १९ या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव व संसर्ग होईल व जिवीतहानी होईल हे माहीत असताना सुध्दा हे सर्वजण मुंबई येथुन विनापरवाना जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचे उल्लघंन करुन पोलीसांची नजर चुकवून अज्ञात वाहनाने आपल्या गावी आलेले आहेत.
तसेच जिल्हाधिकारी सातारा यांचे जिल्हा प्रवेश बंदी बाबतचा आदेश असताना कोरोना सारखा साथीचा रोगाचा फैलाव या प्रवासामुळे होतो हे माहित असताना सुध्दा सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश करुन लोकसेवकाचे आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करणेत आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार के.जी.गोसावी व पोलीस नाईक आर.डी.कणसे हे करीत आहेत.