विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल


स्थैर्य, सातारा, दि. १८ : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासपडे (ता.सातारा) येथील मंगेश राजेंद्र यादव या युवकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पीडित विवाहिता ही मुलगी रडत असल्याने जागी होती. रात्री 11.45 वाजण्याच्या दरम्यान घराच्या दरवाजाची कडी वाजल्याचे निदर्शनास आल्यावर तिने दरवाजा उघडला असता संशयित मंगेश यादव दारात उभा असलेला दिसला. यावेळी त्याने पीडितेचा हात धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पीडितेने आरडा-ओरडा केला असता तिच्या पतीने संशयितास पकडले. या वेळी संशयिताने त्यास शिवीगाळ करून नोकरी घालवण्याची धमकी दिली. या घटनेची फिर्याद बुधवारी दुपारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक राजू शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!