स्थैर्य, फलटण : कोरोना टेस्ट करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व घरातील व्यक्तींना विलीगीकरण करण्यासाठी गेलेल्या महसूल, डॉक्टर व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाशी वाद घालत शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल जाधववाडी येथील एका विरोधात गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.
या बाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. १८ पासून ते गुरुवार दि. २० या कालावधीत जाधववाडी ता. फलटण येथील बिरदेव नगरमध्ये विशाल दिलीप कदम याला व त्याचे घरातील ७ सदस्य हाय रिस्क कॉन्ट्याक्ट मध्ये आहेत. त्यांची कोरोना टेस्ट घेण्याकरिता वारंवार विशाल कदम यांचेमार्फत बोलवले परंतु जाणीवपूर्वक टेस्ट करता हाॅस्पीटल मध्ये आला नाही तसेच महसूल डॉक्टर व पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे पथक घरातील व्यक्तींना घेण्याकरता व विलीगीकरण करण्यासाठी दिनांक २० रोजी दुपारी तीन वाजता गेले असता विशाल दिलीप कदम याने पथकासोबत वाद घातला व घराचा दरवाजा लावून घेतला व शासकीय कामात व्यत्यय आणला. त्याच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास व शेजारील लोकांना रोग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे व डॉक्टर व महसूल सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे आदेशाचे पालन केलेले नाही. म्हणून विशाल कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मंडल अधिकारी विलास जोशी वय ५५ यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गिरी करीत आहेत.