बेकायदेशीर वाळू उपशाप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल


स्थैर्य, औंध, दि. ०४ : वडगांव ते गोरेगाव वांगी रस्त्यावर नांदणी नदीमधून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून ट्रँक्टरमधून चोरून नेत असताना सुर्यकांत ऊर्फ बाळू वसंत शिंदे वय 30 रा. गोरेगाव वांगी ता. खटाव याच्यावर औंंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ट्रँक्टर ट्राँली व एक ब्रास वाळू असा सुमारे पाच लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला आहे. घटनेची फिर्याद प्रशांत पाटील यांनी दिली. अधिक तपास सपोनी उत्तम भापकर करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!