मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । फटाक्याचे रॉकेट लांब लावा, असे सांगितल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन सर्जेराव शिंदे (वय 40) यांनी फिर्याद दिली. हर्षद उमेश चंदवाणी व त्याचा मित्र (नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चंदवाणी याने डोक्यात वीट मारली व त्याच्यासोबतच्या मित्राने छातीवर व कोपरावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. तपास महिला पोलीस नाईक एम. आर. जाधव करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!