
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । सातारा । येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एका महिलेला तीन जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ सप्टेंबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर असणाऱ्या फोडजाई मंदिर नजिक नरेश अंबरशेख भोसले, चिनोर नरेश भोसले,, कमनोर नरेश भोसले या तीन जणांनी जरीना कैलास भोसले रा. वडूज, ता. खटाव या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.



