थकित वीज बिल प्रकरणी एकावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । थकित वीज बिल प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निलेश ज्ञानदेव मोहिते राहणार सांगवी तालुका फलटण यांच्याकडून मागील 21 महिन्यांचे 1 लाख 18 हजार रुपये आणि तडजोड रक्कम 1 लाख असे एकूण 2 लाख 18 हजार रुपये वीज बिल थकीत होते मोहिते यांनी दिनांक 7 जून रोजी 1 लाख 18 हजार रुपये भरले असून तडजोड रक्कम 1 लाख रुपये भरली नाही. म्हणून मोहिते यांच्यावर सरोजा विवेक भारकड यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!