रायगडमध्ये एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट, एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू


 

स्थैर्य, खोपोली, दि.५:  रायगड जिल्ह्याच्या खोपोली
परिसरामध्ये एका केमिकल फॅक्ट्रीच्या रिअॅक्टरमध्ये काल रात्री अडीच वाजता
भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका
महिलेचा समावेश आहे. या स्फोटामध्ये दोन इतर लोक गंभीर जखमी झाली आहेत.
स्फोटानंतर लागलेल्या आगीवर गुरुवारी सकाळपर्यंत पुर्णपणे नियंत्रण
मिळवण्यात आले.

मिळालेल्या
माहितीनुसार, हा स्फोट आर्कोस इंडस्ट्रियल एस्टेटच्या एका छोट्या
प्लांटमध्ये झाला. स्फोटाच्या आवाजाने जवळच्या पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या
सुरक्षारक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर तीन सिक्योरिटी गार्ड
गंभीर जखमी झाले होते, यामधून एकाचा गुरुवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला.
जखमींना खपोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाजा आवाज एवढा भीषण होता
की, 3 ते 4 किलोमीटर लांबपर्यंत लोकांना याचा आवाज ऐकायला गेला. तर एक
किलोमीटरपर्यंतच्या घरांचे आणि कार्यालयांचे काच फुटले. जवळपासच्या अनेक
घरांचे शेडही तुटले असल्याचे लोकांनी सांगितले. घटनास्थळावरील गंभीरता
पाहता स्थानिक प्रशासनाच्या टीमने रात्रभर घटनास्थळावरील आग विझवण्याचे काम
केले.

4 तासात आगीवर मिळवले नियंत्रण

घटनेची
माहिती मिळताच खपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा
स्टील, कर्जत नगर परिषद आणि पेन नगर परिषदच्या 10 फायर ब्रिगेड टीमने मिळून
या आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यासाठी 4 तास कठोर परिश्रम घ्यावे
लागले. स्फोटाचा आवाज ऐकूण जवळपासच्या गावातील लोकांनी घटनास्थळावर मदत
पोहोचवण्याचे काम केले. जवळपासच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना
सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!