अ‍ॅमेझॉनला मोठा दणका


 

स्थैर्य,नवी दिल्ली,दि ८: देशातील किरकोळ व्यापा-यांची संघटना असलेल्या (सीएआयटी) कैटने अ‍ॅमेझॉनच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी एऊ केली आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनमुळे देशातील छोट्या उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहे. कंपनीने 2012 पासून केलेल्या गैरव्यवहारांची लेखी स्वरुपातील माहिती ईडीकडे सोपवली असल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली आहे.

अ‍ॅमेझॉनने सातत्याने देशातील व्यापारी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याचा फटका लहान व्यापा-यांना बसतोय. या व्यापा-यांना एफडीआय आणि फेमा अंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कंपनीने केली आहे. या प्रकरणात सातत्याने तक्रार केल्यानंतरही अ‍ॅमेझॉन कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. देशातील सात कोटी लहान व्यापा-यांमध्ये यामुळे फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याचा दावा कैट संघटनेने केला आहे.

कैट संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीकडून होत असलेल्या फसवणुकीचा पाढा वाचला. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यांकडून एफडीआय, फेमा, वेगवेगळ्या प्रेस नोट यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य सहाय्यक कंपन्या तसेच बेनामी कंपन्या ई कॉमर्स उद्योगांमध्ये सक्रीय आहेत, असा आरोप खंडेलवाल यांनी केला. या प्रकरणात अ‍ॅमेझॉन कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!