शेतकरी आंदोलनाचा 9 वा दिवस:शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा, आता संपूर्ण दिल्ली ब्लॉक करण्याचा निर्णय


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.४: कृषी कायद्याविरोधात
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. सरकारसोबत शनिवारी होणाऱ्या
बैठकीपूर्वी शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे.
तसेच, आंदोलनाला मोठे स्वरुप देण्यासाठी दिल्लीतील रस्ते बंद करण्याचा
निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मीटिंगनंतर शेतकरी नेते हरविंदर सिंग
लखवाल यांनी ही माहिती दिली.

यादरम्यान
सुप्रीम कोर्टात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की,
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिल्लीच्या सीमेवरुन
हटवण्याचे निर्देश द्यावे. अर्जदाराचे वकील ओम प्रकाश परिहार याबाबत माहिती
दिली. परंतू, या अर्जावरील सुनावणीचा दिवस अद्याप ठरलेला नाही.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार परत

शेतकऱ्यांच्या
समर्थनार्थ पुरस्कार परत देण्याचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी लेखक डॉ.
मोहनजीत, चिंतक डॉ. जसविंदर आणि पत्रकार स्वराजबीर यांनी आपले साहित्य
अकादमी पुरस्कार परत केले आहेत. गुरुवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश
सिंग बादल यांनी आपला पद्मविभूषण अवॉर्ड परत केला होता. त्यांच्यासोबतच,
राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढींढसा यांनीदेखील आपला पद्मभूषण परत
करण्याची घोषणा केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!