भागीदारीच्या आमिषाने एकाची ९ लाखांची फसवणूक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२३ । सातारा । भागीदारीच्या आमिषाने एकाची 9 लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 ऑगस्ट 2021 ते 16 मार्च 2023 अखेर सुनील गौतम सरोदे रा. औंध, पुणे याने शुभम शिवाजी पवार रा. आसू, ता. फलटण यांना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी चालू करणार असून त्या कंपनीत गुंतवणूकदार म्हणून 9 लाख रुपये गुंतवणूक करण्याचे सांगून ही रक्कम तुम्हाला पाच महिन्यात परत देऊ, तसेच कंपनीत होणाऱ्या नफ्यातील 50 टक्के रक्कम देतो, असे आमिष दाखवून पवार यांच्याकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात 9 लाख रुपये सुनील सरोदे याने स्वीकारले. यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता सरोदे याने पवार यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!