दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी, फलटण या ठिकाणी ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय राऊत, डॉ. अश्विनी कुतवळ, डॉ. सुनिता निंबाळकर, श्री. रणधीर भोईटे, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र, श्री. प्रतापराव झांजुर्णे, श्री. उमेश निंबाळकर, लायन सौ. सुनीता कदम, ला. श्रीमती सुनंदा भोसले, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, प्राचार्य श्री. अमित सस्ते, पर्यवेक्षक श्री. महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ. सुजाता गायकवाड होते.
यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने प्रथमत: प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण डॉ. संजय राऊत यांनी केले व राष्ट्रगीत, ध्वजगीत म्हणत राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
श्री. ज्ञानेश्वर जाधव यांनी पंचप्रण प्रतिज्ञेचे वाचन केले. प्राचार्य श्री अमित सस्ते यांनी प्रास्ताविक केले.
एल.के.जी व यु. के. जी.च्या विद्यार्थ्यांनी महापुरुष तसेच स्वातंत्र्यवीर यांच्यावरती भाषणे केली. तसेच माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती भारत व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र दिनाचे महत्त्व या नाटिकेचे सादरीकरण केले. उच्च प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी देश गीत “भारत प्यारा देश हमारा”व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी “ध्वज विजयाचा उंच धरा” या गीताचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट असे नृत्य सादर केले.
त्याचबरोबर इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शंभर टक्के उपस्थिती व ‘बेस्ट स्टुडंट’ अवॉर्ड २०२३ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इन्स्पायर मानक २०२३-२४ मधील जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. श्री. संजय राऊत, डॉ. सौ. सुनीता निंबाळकर, डॉ. सौ. अश्विनी कुतवळ यांचा त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुनीता निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले व आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. संजय राऊत यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत पालकांचा विद्यार्थ्यांशी संवाद चांगला असावा, असे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सौ. सोनाली बंडगर व सौ. जागृती गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ. सुषमा नाळे यांनी मानले.