आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
आयडियल इंटरनॅशनल स्कूल, फलटण येथे स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे मॅडम, रमेश आढाव, शिवराज भोईटे, राहुल निकम, लखन बरकडे, श्रद्धा शहा, मयूर भोईटे, पाटील सर, हर्षल लोंढे, पाटसकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे रमेश आढाव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत व ध्वजगीत संपन्न झाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेडचे सादरीकरण करत राष्ट्र ध्वजास सलामी दिली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी ‘कंधे से मिलते हे कंधे’, ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीतांवर ड्रिल नृत्य सादर केले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींनी लेझीमचे सादरीकरण केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी भारतातील विविध प्रांतातील पेहराव करून विविधतेतून एकतेचा संदेश देणार्‍या ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गीतावर नृत्याचे नयनरम्य सादरीकरण केले. देशभक्तीपर समूहगीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सेनानी यांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सर्व नागरिकांना पटवून दिले.


शाळेमध्ये संस्कृतमधील श्लोक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्येउत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांद्वारे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार मानण्यात आले. देशभक्तीपर घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये प्लेग्रुप ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ध्वजारोहणासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका, विद्यार्थी व पालक तसेच परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते. हा सोहळा उत्कृष्टपणे पार पाडण्याचे श्रेय संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे मॅडम, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना जाते.


Back to top button
Don`t copy text!