दैनिक स्थैर्य | दि. 09 मार्च 2024 | फलटण | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याला तब्बल 76 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; अशी माहिती तालुकाप्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू ईवरे यांनी दिली.
– मंजूर केलेल्या विकास कामांचे तपशील पुढील प्रमाणे –
- ३०५४ अंतर्गत मठाचीवाडी कारांडे वस्ती ते चव्हाण वस्ती ग्रा.मा.१०९ रस्ता सुधारणा करणे रक्कम २० लक्ष
- विशेष घटक योजना अंतर्गत मौजे टाकळवाडे येथे मागासवर्गीय वस्तीत आभ्यासिका बांधकाम करणे रक्कम १८ लक्ष
- बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत टाकळवाडे ग्रामपंचायत इमारत बांधने रक्कम २० लक्ष रुपये
- जिल्हा नियोजन अंतर्गत राजाळे भोकरे डि.पी शेजारी नवीन विद्युत डि.पी बसवने रक्कम १० लक्ष रुपये
- टाकळवाडे येथे जनसुविधा अंतर्गत स्माशनभुमी सुधारणा करणे रक्कम ४ लक्ष रुपये
- निंबळक येथे जनसुविधा अंतर्गत स्माशनभुमी सुधारणा करणे रक्कम ४ लक्ष रुपये