
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील जाधववाडी येथील एका घराच्या दरवाजाचा कोयंडा उचकटून त्यामधील रोख रक्कम, दागिने असा ७१ हजार रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला. ही घटना बुधवार, दि. २ मार्च रोजी रात्री घडली. यानंतर याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, जाधववाडी येथील घरात अज्ञात व्यक्तीने घरातील किचनच्या दरवाजाचा कडी आणि कोयंडा उचकटून चोरी केली. या चोरीत ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.यामध्ये रोख रक्कम, मोबाईल तसेच सोन्याचे दागिने चोरुन नेले. या घटनेतंर नितीन शंकर शिंदे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
