दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । जावळी । जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले असल्याची घटना कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65, रा. नेवेकरवाडी ता. जावळी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलगी हिला हाताने इशारा करून इकडं ये’ असे म्हणाल्याने पीडित मुलगी आरोपीकडे गेली असता, आरोपीने पीडितेस चल’, असा म्हणाला असता पीडित मुलगीने नकार दिला. तेव्हा आरोपीने पीडितेच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात नेले. त्यावेळी पीडित मुलीची मैत्रीण तेथून पळून गेली, तेव्हा आरोपी बबलिंगने पीडित मुलीस छपरात नेऊन तिथं तिच्याशी बळजबरी केली. तसेच नको, त्या ठिकाणी त्याने तिला स्पर्श केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी जोरजोरात ओरडल्याने आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. नमूद गुन्ह्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहे.